सेलू: अंतरगाव शिवारात शेताच्या रस्त्यावरून जीवे मारण्याची धमकी, 3 आरोपींवर सेलू पोलिसांत गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Oct 14, 2024 शेतात जाण्याच्या रस्त्यावरून वाद उपस्थित करून तिघांनी जीवानिशी मारण्याची धमकी दिली. ही घटना ता. 13 रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास तालुक्यातील अंतरगाव शेत शिवारात घडली. याप्रकरणी सुरेश सदाशिव चापडे वय 64 रा. बुरांडे लेआऊट वर्धा यांच्या फिर्यादिवरून राजू बकाराम उडाण, अशोक बकाराम उडाण व निलेश विठ्ठल उडाण तिघेही रा. अंतरगाव यांचेवर ता. 14 सोमवारी सायंकाळी 5 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.