सेलू: कोपरा शिवारात आर्थिक विवंचनेतून 40 वर्षीय तरुणाची झाडाला गळफास लावून आत्महत्या, दहेगाव पोलिसांत मर्ग दाखल
Seloo, Wardha | Oct 15, 2024 आर्थिक विवंचनेतून एका 40 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कोपरा शिवारात आज ता. 15 मंगळवार रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. प्रफुल किसनाजी श्रीखंडे वय वर्ष 40 रा. कोपरा असे मृतकाचे नाव आहे. अशी माहिती दहेगाव गोसावी पोलिसांकडून प्राप्त झाली.