रामटेक: अठरा वर्षानंतर पूर्णत्वास येताच खिंडशी पूरक कालव्याला पेंच धरणातून सोडले पाणी
Ramtek, Nagpur | Jun 6, 2026 पारशिवनी तालुक्यातील पेंच धरण ते रामटेक जवळील खिंडसी धरणाला जोडणाऱ्या खिंडसी पूरक योजनेची चाचणी शनिवार दि. 6 जूनला दुपारी कालव्यात पाणी सोडून करण्यात आली. सन 2008 ला सुरू झालेली ही योजना तब्बल 18 वर्षानंतर पूर्णत्वास आली आहे. आता या कालव्याद्वारे पेंचचे अतिरिक्त पाणी खिंडसी पूरक कालव्याद्वारे खिंडसीत सोडले जाणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सिंचणासाठी मुबलक पाणी मिळणार आहे.