रामटेक: वाहीटोला येथे अज्ञात कारच्या धडकेत 9 वर्षीय काव्याचा मृत्यू ; तर मैत्रीण प्रार्थना जखमी
Ramtek, Nagpur | Jun 28, 2026 रामटेक मनसर मार्गावरील वाहिटोला ग्रामपंचायत कार्यालयासमोर रविवार दिनांक 28 जूनला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान एका अज्ञात कारने रस्ता ओलांडणाऱ्या दोन मैत्रिणींना धडक दिली. यातील काव्या संजय उर्फ बाल्या अनकर वय 9 वर्ष रा. वाहीटोला हिचा मृत्यू झाला.तर मैत्रीण प्रार्थना अजय कठोते वय 12 वर्षे रा. वाहिटोला ही जखमी झाली. जखमी प्रार्थना हिला उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे भरती करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. रामटेक पोलीस अधिक तपास करीत आहेत.