पनवेल: पनवेलजवळील नदीत पाण्याच्या प्रवाहात एक जण गेला वाहून
Panvel, Raigad | Jul 6, 2026 पनवेल तालुक्यातील वाघाची वाडी येथील नदीपात्रात पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोन तरुण संकटात सापडले. या दुर्दैवी घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून, दुसरा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. सुमित यशवंत पवार (वय २६, रा. विचुंबे) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर नयन म्हात्रे (रा. विचुंबे) हा तरुण वाहून गेला आहे.