जालना: महानगरपालिकेच्या आदेशाला भाजप कार्यकर्त्यांनी दिला खो!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीव
Jalna, Jalna | Aug 13, 2026 जालना : शहरातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे आदेश अंजली शर्मा यांनी दिले असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात जागोजागी बॅनर झळकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आदेशालाच भाजप कार्यकर्त्यांनी खो दिल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज आणि जाहिरातींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जा