रामटेक: कवडक शेत शिवारातून कृषी साहित्य चोरले; शेतकरी भयभीत
Ramtek, Nagpur | Apr 28, 2026 मंगळवार दिनांक 28 एप्रिलच्या रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास कृष्णा झडबाजी महाजन यांच्या मौजा कवडक येथील शेतात रात्री अज्ञात चोरट्यांनी पिकअप वाहन आणून दहा ते बारा लोखंडी तराफे, बंडीचे चाक, लोखंडी पाईप, पलंग, घमेले, पावडे, टीकास,सब्बल आधी साहित्यसह काही किरकोळ कृषी साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. उल्लेखनीय म्हणजे ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरा झाली आहे.