अक्कलकुवा: मिठयाफळी येथे जि.प.शाळा क्र.2ची इमारत शासनाची परवानगी न घेता परस्पर तोडणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
अक्कलकुवा तालुक्यातील मिठामिठयाफळी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक दोन ची इमारत शासनाची परवानगी न घेता परस्पर तोडणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे आश्याचे निवेदन मिठयाफळी येथील ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना दिले आहे. सदर निवेदनावर हिरालाल वळवी रविदास वळवी प्रवीण वळवी अर्जुन वळवी आदींच्या सह्या आहे.