अक्कलकुवा: गमनचा पांगरपाडा येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विष पाजून खून, चौघांवर मोलगी पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गमनचा पांगरपाडा गावात १० जुलै रोजी रात्री १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस तिच्या घरातच विष पाजून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलीला मोलगी रुग्णालयात दाखल केले प्रकृती चिंताजनक असल्याने नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी १३ जुलै रोजी मोलगी पोलीस ठाण्यात राहुल वसावे नकट्या वसावे विनोद वसावे मिथुन वसावे या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.