अक्कलकुवा: उखळीपाडा ग्रामपंचायतीसमोर दारूबंदी विभाग नंदुरबार पथकाने पकडला अवैध दारूसाठा
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील उखळीपाडा ग्रामपंचायत समोर राज्य उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार पथकाने १२ जुलै रोजी अवैद्य दारू साठा जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार विभाग कडून प्राप्त झाली आहे.