अक्कलकुवा: सातपुडा पर्वत रांगेतील मोरखी तिनखुण्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य , वाहन अडकल्याने प्रवाशांचे हाल
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील दुर्गम भागात रांगेतील मोरखी तिनखुण्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे वाहन अडकल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. महाराष्ट्र गुजरात राज्याला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे हा संपूर्ण रस्ता कुठे खचला आहे तर कोठे चिखलाचे साम्राज्य झाले आहे. वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. वाहन अडकल्यामुळे प्रवाशांना देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत.