रामटेक: भीलेवाडा येथील दुचाकी चोरीचा रामटेक पोलिसांनी केला पर्दाफाश
Ramtek, Nagpur | Jun 2, 2026 पो. स्टे.रामटेक अंतर्गत येणाऱ्या भिलेवाडा येथील एका घरासमोरील चोरीला गेलेल्या एका दुचाकी चोरीचा पर्दाफाश करून 4 आरोपींना पकडण्यात रामटेक पोलिसांना यश आले आहे. मंगळवार दि. 2 जूनला सायं. प्राप्त माहितीप्रमाणे भिलेवाडा येथील फिर्यादीने आपली सीबीझेड दुचाकी क्रमांक 31 डीएक्स 87 32 किंमत अंदाजे 40 हजार रु. घरासमोर उभी केली होती. या दरम्यान मध्यरात्री ती चोरीला गेली. पहाटे ही बाब लक्षात आल्यावर ती न मिळाल्याने पो.. स्टे. रामटेक येथे तक्रार नोंदविण्यात आली होती.