रामटेक: 32 तासापर्यंत पेचच्या जंगलात भटकलेली साठ वर्षीय सन्नोबाई परतली सुखरूप
Ramtek, Nagpur | Jul 22, 2026 पेंच व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी प्रसिद्ध आहे. अशातच 60 वर्षीय सन्नोबाई रतनलाल इडपाचे ही महिला 20 जुलैला बकऱ्या चारावयास जंगलात गेली. ती खुरसापारच्या जंगलात भटकली. ती जंगलातच भटकत राहिली. तब्बल 32 तासानंतर ती बुधवार दिनांक 22 जुलैला वनविभाग व देवलापार पोलिसांच्या शोध पथकाच्या हाती लागली.