रामटेक: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी रामटेक बिडीओ ला निवेदन
Ramtek, Nagpur | Aug 4, 2026 महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तालुका रामटेक च्या वतीने रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या दूर करण्यासाठी खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव यांना चार ऑगस्ट ला दुपारी निवेदन देण्यात आले. यापूर्वी कित्येकदा निवेदन देण्यात आले. परंतु समस्या जैसे थेच असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. रावसाहेब झटाळे यांनी सांगितले. डॉ. रावसाहेब झटाळे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.