कुर्ला पूर्व साबळेनगर येथील रेल्वेच्या जीर्ण इमारती तोडा, अन्यथा उपोषण: खासदार वर्षा गायकवाड
आज दिनांक 24 मे 2025 वेळ दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी कुर्ला पूर्व सावळे नगर येथील जीर्ण झालेल्या रेल्वेच्या इमारतीची पाहणी केली असून नागरिक बरेचदा या इमारतीचा धोका असल्याने इमारती तोडण्याची मागणी करत आहेत मात्र या इमारती रेल्वे कडून तोडल्या जात नाहीत या इमारती आठ दिवसात तोडून कारवाई करावी अन्यथा या ठिकाणी उपोषण तीव्र प्रकारचे केले जाईल असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या