पालिका पावसाळ्यात विक्रोळी पार्कसाईट ,रामनगर, खंडोबा टेकडी येथील डोंगराळ भागावरील नागरिकांना नोटिसा देऊन काय साध्य करते
आज दिनांक 23 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे मुंबई युवकाध्यक्ष अडवोकेट अमोल मातेले यांनी घाटकोपर पालिका एन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बिलाळे यांची भेट घेऊन पालिका पावसाळ्यात विक्रोळी पार्कसाईट रामनगर खंडोबा टेकडी वर्षानगर येथील डोंगराळ भागावरील नागरिकांना स्थलांतरित नोटीस देऊन काय साध्य करते त्यांना पर्यायी व्यवस्था कधी करणार असा प्रश्न ऍड मातेले यांनी पालिकेला केला.