कळमेश्वर: विदर्भाचे पंढरपूर येथे जिल्हाधिकारी व आमदार यांचा महापूजेत सहभाग
आज देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र धापेवाडा येथे जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांचा सोबत महापूजा केली व श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी राज्याच्या, देशाच्या आणि सर्व जनतेच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, शांती व प्रगतीसाठी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना केली. पांडुरंगाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समाधान आणि भरभराट नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.