कळमेश्वर: कळमेश्वर मध्ये घरकर वाढविल्यामुळे नागरिकांचा संताप, विशेष सभा घेऊन करवाढ स्थगित करण्याची मागणी
कळमेश्वर–ब्राह्मणी नगर परिषदेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या घरकर वाढीविरोधात नागरिकांचा तीव्र आक्रोश समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी नगराध्यक्षांना निवेदन देत प्रस्तावित करवाढ तात्काळ स्थगित करण्याची, तसेच यावर विशेष सभा बोलावून सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, करवाढीचा निर्णय लोकप्रतिनिधींशी चर्चा न करता घेण्यात आला असून, नागरिकांचे मतही विचारात घेण्यात यावे