रामटेक: डोंगरताल लाल दिवान शाह दर्ग्याचा उर्स उत्साहात साजरा
Ramtek, Nagpur | May 19, 2026 रामटेक तालुक्यातील देवलापार जवळील डोंगरताल लाल दिवान शाह दर्ग्याचा पारंपारिक ऊर्स मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या ऊर्सदरम्यान परिसरासह दूरदूरच्या हजारो भाविकांनी हजेरीलावून दर्ग्यात माथा टेकून प्रार्थना केली. दर्गा व परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.मंगळवार दिनांक एकोणतीस मे च्या रात्री उत्सवाचे समापन करण्यात आले. उत्सवाचे खास आकर्षण ठरले ती पारंपारिक संदल मिरवणूक आणि आकर्षक पद्धतीने सजवलेले नृत्य करणारे घोडे. या दरम्यान देवलापार पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.