बदनापूर तालुक्यातील काजळा शिवारात शेतात कुंपण घालत असताना दोन जणांनी लोखंडी पाईप व कुर्हाडीने मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली. शनिवार दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या मारहाणीत घनशाम पिराजी देवकाते रा. काजळा ता. बदनापूर जि. जालना हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जालन्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू आहेत. घनशाम देवकाते यांनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांची काजळा शिवारातील गट क्रमांक 199 मध्ये शेती आहे.