सावंतवाडी: सिंधुदुर्गातील आजगावमळेवाड रस्त्यावर दुकानाला आग, मोठा अनर्थ टळला
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव तांबळवाडी भागातील कामाक्षी ट्रेडर्स दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. परिसरातील नागरिक आणि वायरमन दत्ताराम पांढरे यांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आल्याने मोठ्या दुर्घटनेचा सामना टळला.