देवनार पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश पाटील आणि निर्भया पथकातील महिला अधिकारी यांच्या पुढाकाराने बाल लैंगिक तस्करीविरुद्ध आज गुरुवार दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता देवनार परिसरातील ३०० हून अधिक ऑटो रिक्षांवर आणि ४ बेस्ट बसवर जनजागृती पोस्टर्स लावत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.