कळमेश्वर: कळमेश्वरातील अंध खुनाचा छडा, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी, दोन आरोपी जेरबंद
नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अंध खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.दि. २० जुलै २०२६ रोजी कळमेश्वर परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली तपासा दरम्यान मृतकाची ओळख पटली