आज नगर 19 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून तसेच पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. आज शिवरायांची 396 वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असून, जालन्यातही शिवजयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रेमी आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. जालना जिल्ह्