इंदापूर: मी जिंकता जिंलता हरलो आणि समोरचा माणूस हारता हरता जिंकला हर्षवर्धन पाटील यांचं लाखेवाडीत प्रतिपादन
Indapur, Pune | Apr 20, 2024 लोकशाहीमध्ये निवडणुका फार महत्त्वाच्या असतात लोकांच्या माध्यमातून मला निवडून द्या आणि निवडून दिल्यानंतर मला सत्ता द्या आणि सत्तेतून विकास करतो असं गणित असतं.मात्र 2019 च्या निवडणुकीत आपण जिंकता जिंकता हरलो आणि समोरचा माणूस हारता हरता जिंकला याचा खूप त्रास झाला. माझ्या आयुष्यातली गेली दहा वर्ष वाया गेली. याचा दोष मी कोणाला देत नाही मात्र यामुळे तुमचं गाव लेव्हलला नुकसान झालं तर माझं राज्य लेव्हलला नुकसान झालं असल्याचं प्रतिपादन भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी लाखेवाडीत केले आहे.