पत्रकार असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी उकळणार्या दोन तोतया पत्रकारांचा खरा चेहरा इंदापूर पोलिसांनी उघड केला आहे. धमक्या, बदनामीची भीती आणि आर्थिक पिळवणूक करून एका हॉटेल व्यावसायिकास अक्षरशः आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेणार्या या दोघांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.