अज्ञात कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी वस्तूने जोरदार प्रहार करून हत्या केल्याची घटना शेळगाव (ता. इंदापूर) येथील गावठाण परिसरात उघडकीस आली आहे. आज मंगळवारी (ता. 23) पहाटे हि घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे.