इंदापूर तालुक्यातील भांडगाव येथे श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी जमली आहे. या गर्दीचा गैरफायदा घेत बनावट विदेशी मद्याची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका इसमाला राज्य उत्पादन शुल्क विभाग, दौंड यांनी अटक केली आहे.या कारवाईत सुमारे 49,275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.