जालना: मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रशासनाची धावपळ; मराठा-कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी मंडळनिहाय शिबिरांना चांगला प्रतिसाद
Jalna, Jalna | Sep 10, 2026 मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप तसेच उपलब्ध नोंदींची पाहणी करण्यासाठी जिल्हाभरात आजपासून महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांना मराठा बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विविध महसूल मंडळांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुणबी नोंदी तसेच जात प्रमाणपत्रासंदर्भात माहिती जाणून घेतली. गुरुवार दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांच्या ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आले आहेत.