कळमेश्वर: धापेवाडा फाट्यावर काळजाचा थरकाप! अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोन गंभीर
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील धापेवाडा परिसरातील पोद्दार पेट्रोल पंपाजवळ ६ एप्रिल सोमवारला दुपारच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली सदर घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड व त्यांच्या टीमला मिळताच घटनास्थळी धाव घेतली व पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला.