परांडा: परंड्यात मोटारसायकल लुटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश
परंडा येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल अडवून लुटमार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. एका संशयिताला ताब्यात घेत सोन्याचे दागिने, मोबाईल आणि मोटारसायकल असा 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.