कळमेश्वर: कळमेश्वर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
आज मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी कळमेश्वर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक कार्यक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले. अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते