तुळजापूर: नळदुर्गच्या किल्ल्यावर महिलेने तीन मुलांसह उडी घेतली, दोघांचा मृत्यू
नळदुर्ग किल्ल्यात अश्विनी मनोहर पौळ या महिलेने तीन मुलांसह उडी घेतली. अश्विनी आणि मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. दोन जुळ्या मुली जखमी असून रात्री एक मुलीचा मृत्यू झाला. पोलिस तपास करत आहेत.