रामटेक: राष्ट्रीय महामार्गावर पथरई शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार ; पवनी बफर क्षेत्रातील घटना
Ramtek, Nagpur | Jul 14, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पथरई शिवारात मंगळवार दिनांक 14 जुलै च्या पहाटे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबटचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पवनी एक संघ नियंत्रण कक्षा अंतर्गत हा भाग येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी अभिजीत माने यांनी दिली.