नागपूर ग्रामीण: बुटीबोरी पोलिसांची मोठी कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील टोळीवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई
बुटीबोरी पोलिसांनी परिसरात दहशत माजवणाऱ्या लोकेश डाबरे आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये कडक कारवाई केली आहे. एका वृद्ध व्यक्तीच्या खून प्रकरणात या टोळीचा सहभाग निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.वसंता रामाजी नेवारे वय ४८ वर्षे हे बेपत्ता झाल्यानंतर तपासादरम्यान त्यांचा खून झाल्याचे उघड झाले. लोकेश डाबरे आणि त्याच्या साथीदारांनी दारू पिण्याच्या वादातून ही हत्या केली होती.