महाराष्ट्रात आरोग्य क्रांतीचा नवा अध्याय! नागपुरातून 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानाचा राज्यव्यापी शंखनाद
"उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देऊन गावपातळीवर आरोग्याचा जागर करा" – आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबीटकर यांचे आवाहन
4k views | Gondia, Maharashtra | Apr 3, 2026 ग्रामीण महाराष्ट्राचा आरोग्यविषयक चेहरा-मोहरा बदलण्यासाठी आणि "निरोगी महाराष्ट्र" हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. याच ध्येयाने प्रेरित अशा 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' या महत्त्वाकांक्षी अभियानाचे रणशिंग आज नागपुरातून फुकण्यात आले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते नागपूर येथील एम्स (AIIMS) मध्ये आयोजित भव्य विभागीय कार्यशाळेत या अभियानाचा अधिकृत शुभारंभ झाला