सेलू: विषारी द्रव प्राशन केलेल्या सोंडी येथील 23 वर्षीय तरुणाचा सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू, सेलू पोलिसांत मर्ग दाखल
Seloo, Wardha | Dec 3, 2024 सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सोंडी येथील अमोल देवराव उईके वय 23 वर्ष याने विषारी द्रव प्राशन केल्याने त्याचा ता. 2 डिसेंबर सोमवारी दुपारी 12.45 वाजता कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयातील प्राप्त अहवालावरून याप्रकरणी ता. 3 डिसेंबर मंगळवारला दुपारी 4 वाजता सेलू पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. असे पोलिसांकडून सांगण्यात आले.