कळमेश्वर: ब्राह्मणी परिसरात अनधिकृत वेस्ट कॉटन कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली
ब्राह्मणी परिसरातील एका अनधिकृत वेस्ट कॉटन (कापूस कचरा) कंपनीला आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणात कापूस व इतर साहित्य जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले