रामटेक: देवलापार येथे कारमध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या 6 पशूंचे वाचवले प्राण
Ramtek, Nagpur | Jul 31, 2026 पो. स्टे.देवलापार अंतर्गत येणाऱ्या जुन्या पोलीस स्टेशन समोर देवलापार पोलिसांनी नाकाबंदी करून गुरूवारच्या मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास अवैध गो तस्करी करणाऱ्या एका कारला थांबून त्यात क्रूरपणे कोंबलेले सहा पशुंना सोडवून त्यांचे प्राण वाचवले. यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून एकूण तीन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.