महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीने व अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाला मोठा प्रमाणात फटका बसला असून बरेच नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली,शेत जमिनी वाहून गेल्या या पार्श्वभूमीवर नीलवसंत मेडिकल फाउंडेशनतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या डॉ.वसंतराव पवार स्मृती पुरस्काराच्या आयोजनातील इतर खर्चाला फाटा देऊन ती रक्कम पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे ठरविले होते त्यानुसार आज आयुक्त प्रवीण गेडाम यांना सव्वा लाखांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.