नरखेड: ५० लाखांच्या मुद्देमालासह वाळूचा अवैध टिप्पर जप्त, नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली कार्यवाही
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदी उमरी येथे नाकाबंदी करून अवैध रेती वाहतूक करणारा १० चाकी टिप्पर जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५० लाख ३१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गणेश सदाशिव रेवतकर,गुणवंत रामरावजी बोडखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून टिप्पर आणि रेती ६.२५ ब्रास रेती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.