सावनेर: खापरखेडा,पिंपळा,खापा येथे महाशिवरात्रि उत्सव उत्साहात साजरा, आमदार यांची उपस्थिती
'आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त खापरखेडा, पिपळा, वाकोडी व खापा येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित राहून, श्री महादेवाचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले. या मंगल प्रसंगी सर्व बंधू भगिनींना, भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.