रामटेक: गणेश पेठ बस स्थानकावर रामटेकच्या युवकाचा आयफोन चोरी; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Ramtek, Nagpur | Apr 8, 2026 गणेशपेठ बस स्थानक नागपूर येथे बस मध्ये चढताना एका अज्ञात चोरट्याने बस मध्ये चढत असलेल्या रामटेक येथील अभिषेक अनिल सहानी वय 25 वर्ष रा. भाग्यश्री कॉलनी परसोडा रामटेक याचा महागडा आयफोन 16 प्रो मोबाईल लंपास केला. ही घटना मंगळवार दिनांक 7 एप्रिल ला साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली असून ही घटना बस स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा आधार घेत पोलीस व बस स्थानक पोलीस अज्ञाताचा शोध घेत आहेत.