धुळे: बनावट लग्न करून फसवणाऱ्या टोळीला चाळीसगाव रोड पोलिसांनी नंदुरबार शहादासह परराज्यातून घेतले ताब्यात
Dhule, Dhule | Sep 3, 2024 धुळे शहरातील लग्नाळू मुलाची व त्याच्या कुटुंबीयांची बनावट नवरी व तिच्या बनावट कुटुंबीयांनी केलेली फसवणूक चाळीसगाव रोड पोलिसांनी उघडकीस आणत या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, या बनावट नवरी सह तिच्या सर्व बनावट कुटुंबीयांना देखील चाळीसगाव रोड पोलिसांनी शहादा नंदुरबार सह पर राज्यातून अटक केली आहे. या कारवाईत एका विधीसंघर्षीत बालकेसह दोन महिला आणि दोन पुरुषांना चाळीसगाव रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.