रामटेक: श्री लंबे हनुमान मंदिर रामटेक येथे नवयुवक मित्र परिवाराने केले महाप्रसादाचे वितरण
Ramtek, Nagpur | Apr 2, 2026 हनुमान जयंतीच्या पावन-पर्वावर रामटेक शहरातील जगनाडे चौकातील श्री लंबे हनुमान मंदिर कमिटीद्वारे प्रति वर्षानुसार हनुमान जयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. नवयुवक मित्रपरिवार,शनिवारी वार्ड रामटेक यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यापूर्वी मंदिरात सकाळी अभिषेक पूजा पाठ, अर्चना, होम,हवन करण्यात आले.नंतर प्रसाद व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.