रामटेक: शहनाज अख्तर च्या भजनांनी दुमदुमले देवलापार
Ramtek, Nagpur | Apr 5, 2026 राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत कट्टा देवलापारच्या प्रांगणात चार एप्रिलला सायंकाळी आठ वाजता पासून प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांच्या भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना रामटेक तालुका च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांचा जाहीर सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शहनाज अख्तर यांनी एकाहून एक सरस भक्ती गीते सादर केली. त्यांनी हिंदू धर्मावर आधारित भजने गायली.