रामटेक: गड मंदिर रामटेक येथे खोदकामात मिळालेला हंडा हा दगडांचा रांजण असल्याचा पुरातत्व विभागाचा निष्कर्ष
Ramtek, Nagpur | Apr 11, 2026 गड मंदिर रामटेक येथील वराह दरवाजा परिसरात पायरीचे खोदकाम सुरू असताना शुक्रवारला एका दगडाचा हंडा सापडला होता. यानंतर परिसरात विभिन्न चर्चेला उधाण आले होते. खोदकार्य थांबवून पुरातत्व विभागाला याची सूचना देण्यात आल्यानंतर शनिवार दि. 11 एप्रिलला पुरातत्त्व विभागाची त्रिसदस्य चौकशी समिती रामटेक येथील गड मंदिर परिसरातील खोदकार्यस्थळी पोहोचली. तपासाअंती हा प्राचीन दगडी घडा हा मध्ययुगीन काळात गडकिल्ल्यांवर येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुसाठी पिण्याचे पाण्यासाठी ठेवलेले असायाचे असा निष्कर्ष निघाला.