जालना: कर्जाची परतफेड टाळण्यासाठी जिवंत असतानाच स्वतःला मृत घोषित केलं; अखेर कदीम पोलीसात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Aug 12, 2026 कर्जाची परतफेड टाळण्यासाठी जिवंत असतानाच स्वतःला मृत घोषित करून बनावट मृत्यू प्रमाणपत्र वित्तीय कंपनीकडे सादर केल्याचा धक्कादायक प्रकार जालना शहरात समोर आला आहे. या प्रकरणी नावी फिनसर्व लिमिटेड कंपनीच्या दक्षता विभागातील व्यवस्थापकाच्या तक्रारीवरुन कदीम जालना पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन दिनकर गोदाम रा. रेल्वे क्वार्टर परिसर, जालना असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे. बुधवार दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ही माहिती मिळाली.