अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयात बारा वर्षीय बालिकेचा विनयभंग करणाऱ्या मद्यपी आरोपीला नागरिकांनी दिला चोप
रुग्णाच्या नातेवाईकांसोबत आलेल्या एका बारा वर्षीय बालिकेचा विनयभंग करणार्या मद्यपी आरोपीला नागरिकांनी चांगलाच चोप दिला.ही घटना 4 डिसेंबर रोजी दुपारी दिड वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाल रोग विभाग परिसरात घडली. याप्रकरणात पिडित मुलीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी शेख मतीन शेख अजीज (33, रा. लालखडी) याच्याविरुध्द गुन्हा नोंदवून,त्याला अटक केली.जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाल रोग विभाग (वार्ड क्र.5) येथे लहान मुलांवर उपचार केला जाते.