सेनगाव: कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे न घेतल्यास मोठे आंदोलन छेडू,बच्चू कडू यांचा इशारा
गटविकास अधिकारी यांनी दाखल केलेला गुन्हा जर मागे घेतला नाही तर मोठे आंदोलन आम्ही छेडण्याच्या तयारीत असल्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज सांगितले आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे यांच्यासह अन्य तिघांवर सेनगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी संविधान दिवस का साजरा केला नाही याची विचारणा केल्याने ॲट्रॉसिटीसह व इतर स्वरूपाचा गुन्हा दाखल केल्याने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.